Breaking News

फुले व्यापारी संकुलातील दुकानाला आग

जळगाव, दि. 31, जानेवारी - जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या फुले व्यापारी संकुलातील टेलरींगच्या दुकानाला आग लागुन 3 लाख 95 हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्र वल्लभभाई इगु रा. आदर्शनगर यांच्या टेलरींगच्या दुकानाला काल रात्री 9 ते आज सकाळी 8.30 वाजेच्या दरम्यान आग लागली यात. 5 शिलाई मशील, शिवून तयार असलेले कपडे, टेलरिंगचे साहित्य असे 3 लाख 95 हजार रुपये किमतीचे नुकसान झाले. याबाबत जितेंद्र इगु यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास एएसआय उल्हास च हाटे करत आहेत.