Breaking News

विषय समितीच्या सभापती निवडीत आघाडीची सरशी

जळगाव, दि. 31, जानेवारी - चाळीसगाव नगर परिषदेतील विषय समित्याच्या सभापदी पदाच्या निवडीत सत्ताधारी भाजपला धक्का बसला आहे. सभापदी पदासाठीचे नामनिर्दे शनपत्र चुकीचे भरल्याने भाजपच्या 4 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे निवडीत शहर विकास आघाडीची सरशी होऊन 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले. नगर प रिषदेत बहुमत असून देखील भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.


नगर परिषदेच्या दालनात विषय समित्याच्या सभापती निवडीसाठी नगर परिषदेची आज विशेष सभा बोलविण्यात आली होती. सभेस पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार कैलास देवरे यांच्यासह नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्षा आशालता चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे व्यासपीठापर उपस्थित होते. 
सकाळी 10 ते 12 या कालावधीत मुख्याधिका-यांकडे नामनिर्देशनपत्र सादर करण्यात आले. दोघही बाजुंनी 5-5 नामनिर्देशनपत्र सादर करण्यात आले होते. विषय समित्याच्या निवडीत नियमानुसार नगर परिषदेच्या सदस्यास अनुमोदक म्हणून सभापतीपदाच्या एकाच नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करता येते. या नियमांचा हवाला देत आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांनी भाजपच्या नामनिर्देशन पत्रांवर हरकत घेतली. 

भाजपकडून पाणी पुरवठा सभापती पदासाठी शामलाल कुमावत व शिक्षण सभापतीपदासाठी संजय रतन पाटील यांनी नामनिर्देशनपत्र भरले होते. या दोघांच्या नामनिर्देशनपत्रावर अनुमोदक म्हणून नगरसेवक मानसिंग राजपुत यांनी स्वाक्षरी केली होती. तसेच महिला व आरोग्य सभापती पदासाठी वैशाली सोमसिंग राजपूत यांनी व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी विजया प्रकाश पवार यांनी भाजपकडून नामनिर्देशनपत्र दाखल केली होती. या दोघांना नगरसेविका वैशाली महेंद्र मोरे या अनुमोदक होत्या. भाजपच्या नामनिर्देशन पत्रांवर अनुमादक म्हणुन एकाच नगरसेवकाच्या दोन ठिकाणी स्वाक्ष-या असल्याने भाजपच्या चारही उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. बांधकाम समिती सभापतीसाठी भाजपक डून चंद्रकांत तायडे व आघाडीकडून शेखर देखमुख या दोघांचे अर्ज वैध ठरले होते. आघाडीचे उमेदवार शेखर देशमुख यांनी माघार घेतली. त्यामुळे बांधकाम सभापतीपदी चंद्रकात तायडे यांची बिनविरोध निवड झाली.