Breaking News

राजेंद्र पवार सुवर्णपदकाचा मानकरी


कोपरगाव / प्रतिनिधी :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेत के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या राजेंद्र पवार यास सुवर्णपदक मिळाले. आज पार पडलेल्या विद्यापीठ पदवीदान समारंभात पवार याला कुलपती सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. याशिवाय त्यास डॉ. अनुराधा भोइटे स्मृती सुवर्णपदक, सुधा ढवळे सुवर्णपदक व नलिनी ठक्कर सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, संजीव कुलकर्णी, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, सदस्य संदीप रोहमारे, सचिन तांबे, अधिक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आवारी, डॉ. सुरेश देवरे, प्रा. कैलास वाघ यांनी विशेष कौतुक केले.