Breaking News

सरन्यायाधीश आणि न्यायमूर्तीं यांच्यातील ‘सर्वोच्च’ वादावर पडदा


नवी दिल्ली : सरन्यायाधीश आणि 4 न्यायमूर्तींमधला वाद मिटला, सर्वोच्च न्यायालय व बार काऊन्सिल अध्यक्ष मननकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. सोमवारी सकाळी अटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल आणि हे 4 न्यायमूर्ती यांची अनौपचारिक भेट झाली. त्यानंतर मननकुमार मिश्रा यांनी सांगितले की हा वाद मिटला आहे. हे आपसातले वाद होते. न्यायमूर्तींनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर तोडगा काढला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सामान्य पद्धतीने काम सुरू झाले आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी 12 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्‍वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार प रिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत. न्यायमूर्ती जे. चेलमेश्‍वर यांच्या घरासमोर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.