सोनई हत्याकांडात सहा संशयीत दोषी,अशोक फलके निर्दोष, 18 जानेवारीला सुनावणार सजा
नाशिक ः अहमदनगर जिल्ह्यातील थरारनाट्य सोनई तिहेरी हत्याकांडातील सात पैकी सहा आरोपी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून अशोक रोहीदास फलके या एका संशयिताविरूध्द सबळ पुरावे सिध्द करण्यास फिर्यादी पक्ष अपयशी ठरल्याने त्यास निर्दोष ठरविण्यात आले आहे. त्या सहा आरोपींविरूध्द दोषारोप सिध्द झाल्याने 18 जानेवारीला त्यांना सजा सुनावली जाणार आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, सन 2013 चा पहिला दिवस अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालूक्यातील सोनई मध्ये तिहेरी खुनाचा थरार घेऊन आला. नेवासा फाट्यावरील त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बी.एड.चे शिक्षण घेत असलेली पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी मेहेतर समाजातील मुलाच्या प्रेमात पडली म्हणून संतप्त झालेल्या दरंदले कुटूंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी तीन युवकांचा अत्यंत निर्दयपणे खुन केल्याची घटना 1 जानेवारी 2013 रोजी घडल्याने अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट ्रात खळबळ उडाली होती. या प्रकरणी संशयीत सात जणांवर गुन्हा दाखल होऊन खटला भरला गेला. ऑनर किलींगच्या या प्रकरणाची सुनावणी अहमदनगर न्यायालयात झाल्यास संशयीतांच्या सामाजिक स्तरामुळे तपास यंत्रणेवर, साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो म्हणून नाशिक किंवा जळगाव जिल्हासत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी व्हावी अशी मागणी झाल्याने नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज झाले.
असे घडले हत्याकांडः
त्रिमुर्ती शिक्षण संकुलमध्ये बी.एडचे शिक्षण घेत असलेल्या मुलीचे त्याच संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या मेहेतर समाजातील सचिन सोहनलाल घारूशी जवळीक निर्माण होऊन प्रमसंबंध जुळले होते. ही बाब दरंदले कुटूंबाला समजल्यानंतर सामाजिक प्रतिष्ठा जागी झालेले मुलीचे वडील पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले(चुलते) गणेश उर्फ प्रविण पोपट दरंदले (भाऊ) संदीप माधव कुर्हे(मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहीदास फलके व अशोक सुधाकर नवगीरे यांनी संदीप राजू थनवार, सचिन मोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे या तिघांना 1 जानेवारी 2013 रोजी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरूस्तीसाठी वाजवीपेक्षा जास्त मजूरीचे अ मिष दाखवून बोलावून घेतले. यावेळी संशयीतांनी संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार मारले. त्यानंतर पळून जाणार्या राहूल कंडारे याचा कोयत्याने, तर स चिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्यामध्ये अडकवून खुन केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होऊन आरोपपत्र सादर झाले.
सरकारी पक्षातर्फे बाजू मांडतांना विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी संशयतांविरूध्द उपलब्ध साक्षी पुराव्यांची अभ्यासपुर्ण मांडणी करून उणीवांचा फायदा संशयीतांना होणार नाही असे सुक्ष्म विवेचनपुर्ण युक्तीवाद करून या प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयासमोर मांडले. तथापी या प्रकरणातील सातवा संशयीत अशोक रोहीदास फलके याचा या हत्याकांडाशी संबंध नाही, त्याच्याविरूध्द सादर केलेले पुरावे कपोकल्पीत असल्याचा युक्तीवाद करून आरोपीचे वकील अॅड. राहूल कासलीवाल यांनी अशोक फलकेचे निर्दो षीत्व न्यायालयाच्या निदर्शनास आणले. इतर सहा आरोपींप्रमाणे फौजदारी स्वरूपाचा हत्येचा कट रचल्याचा आरोप अशोक फलकेवर ठेवण्यात आला होता. या गुन्ह्यात एकूण 53 साक्षीदार तपासण्यात आले. अशोक फलकेवर आरोप ठेवताना त्याचा मोबाईल नंबर, घटनेच्यावेळी तो चालू होता की बंद होता, शिवाय गुन्ह्यात वापरले गेलेले लाकडी दांडके, व त्याच्याशी दाखवलेला गेलेला अशोक फलकेचा सबंध या बाबींची फॉरन्सीक लॅबमध्ये तपासणी झाली नसल्याने फिर्यादी पक्षाने सादर केलेले अशोक फलके विरूध्दचे पुरावे गुन्हा सिध्द करू शकत नाही असा युक्तीवाद अडॅ. राहूल कासलीवाल यांनी केल्याने अशोक विरूध्द दोषारोप सिध्द झाला नाही. दरम्यान अन्य सहा आरोपींना येत्या 18 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.
जातीयवादी जिल्हा?
अहमदनगर जिल्ह्यात मधल्या काही काळात वेगवेगळ्या हत्याकांडाने प्रचंड सामाजिक तणाव निर्माण झाला होता. या हत्याकांडामुळे अहमदनगर जिल्हा जातीयवादी असल्याची बदनामी या जिल्ह्यातील नागरिकांच्या वाट्याला आली होती. सोनई, जवखेडा, खर्डा अशा काही घटनांमुळे सामाजिक सलोखा ऐरणीवर आला होता. त्यातच खर्डा प्रकरणात सर्व संशयित निर्दोष सुटल्याने कडेलोटावर आलेला सामाजिक सलोखा सोनई प्रकरणाच्या निकालाच्या प्रतिक्षेत होता. या प्रकरणातील सहा आरोपी दोषी ठरल्याने सामाजिक सलोख्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
निकाल समाधानकारक ः अडॅ. कासलीवाल
गुन्हेगारांना सजा व्हायलाच हवी. तथापी निरपराधाला सजा झाली तर नैसर्गीक न्याय झाल्याचे समाधान मिळत नाही. म्हणूनच शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला सजा होऊ नये ही आपल्या न्यायव्यवस्थेची धारणा आहे. त्याच अर्थाने खटल्यात संशयितांविरूध्द सबळ पुरावे सादर करून त्यांची सत्यता सिध्द व्हावी लागते. या क सोटीवर या खटल्याचे फिर्यादी पक्ष अशोक फलके विरूध्द आरोप सिध्द करू शकले नाहीत. या खटल्यात अशोकला न्याय मिळाला याचे समाधान आहे.