Breaking News

व्हाल्वो' बसचे शेवगांव बस स्थानकात आगमन !


शेवगांव/ प्रतिनिधी/- शेवगांव बस स्थानकात सर्वप्रथम व्हाल्वो बसचे आगमन झाले. शेवगांव बस आगारात( एम एच ०९ ई एम २२९३) या बसचे मोठे दिमाखदार आगमन झाले.परभणी-पुणे, हि बस परभणी आगाराची बस असून तिचे शेवगांव आगारात आगमन झाले. सर्वप्रथम या मार्गावर धावण्याची परवानगी राज्य परिवहन महामंडळाने परभणी आगाराला दिली. नवी कोरी असलेली परभणी-पुणे ह्या बसच्या फेर्या आता रांञदिवस चालू राहणार आहेत.
शेवगांव मध्ये आलेल्या ह्या बसला शेवगांवच्या सवयी प्रमाणे सुमारे अर्धा तास रहदारीत ताटकळत रहावे लागले. नित्यसेवा हाँस्पीटल पासून शेवगांव बसस्थानकात येण्यासाठी सुमारे अर्धा तास इतका वेळ लागला. ह्या बसला प्लॅटफॉर्म वर वळण्यासाठी डेपोत जावे लागले. बस स्थानकावरील लोक माञ या बसकडे मोठ्या कुतूहलाने या पाहात होते. नुकतेच भंडारा ते गेवराई या राष्ट्रीय महामार्गाला परवानगी मिळाली. ह्या परवानगीचा शुभ शकून झाल्याची चर्चा प्रवाशी वर्गात होती