शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
संगमनेर/प्रतिनिधी :- तालुक्यातील गुंजाळवाडी पठार शिवारात चंद्रकांत भाऊ मेंगाळ या शेतकऱ्याने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात मयताचे भाऊ शिवाजी भाऊ मेंगाळ यांनी फिर्याद दिली. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास हे. को. एन . बी. धंदे करत आहेत.
