पारनेर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांकचे अध्यक्ष एम. एच. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत पारनेर शहरातील शेख शब्बीर बादशहा यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याकचे अध्यक्ष इर्शाद जहागीरदार यांच्या हस्ते शेख यांनी सदर निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल पारनेर काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. भास्कर शिरोळे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारे, युवा नेते शैलेंद्र औटी, युवराज पठारे, हसन राजे, राजेन्द्र करंदीकर आदींनी शेख यांचे अभिनंदन केले.
काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी शेख
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:39
Rating: 5