तालुका भाजपाच्यावतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त काढण्यात आलेल्या तिरंगा एकता रॅलीचे मोठ्या उत्सहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीचे नेतृत्व भाजपा तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे आणि वसंत चेडे यांनी केले. सामाजिक सदभावनेचा संदेश देत रॅलीला निघोज येथून प्रारंभ झाला, जवळा, राळेगण थेरपाळ, पिंपळनेर, राळेगणसिद्धी, नारायणगव्हाण, सुपा, पारनेर, कान्हूर टाकळी ढोकेश्वर, पिंपळगांव रोठा, ढवळपुरी, भाळवणी, गोरेगांव, डिसकळ या मार्गे रॅली काढण्यात आली.
यावेळी कृष्णाजी बडवे, वसंत चेडे, विश्वनाथ कोरडे, सुभाष दुधाडे, डॉ. अजित लंके, सुनिल थोरात, सागर मैड, भिमा औटी, मनोहर राउत, मोहन खराडे, बाबाजी येवले, सुदाम म्हस्के, पोपट मोरे, चंद्रभान ठुबे, बंडू ऱांधवन, पोपट लोंढे, संभाजी बालवे आदीसंह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले.
एकता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:21
Rating: 5