Breaking News

कबड्डी स्पर्धेत अक्षय स्पोर्ट्स संघ विजेता


सिंधुदुर्गनगरी, दि. 18, जानेवारी - नागेश्‍वर कला क्रीडा मंडळ कणकवली आयोजित कबड्डी स्पर्धेत अक्षय स्पोर्ट्स हा संघ विजेता तर कोहिनूर स्पोर्ट्स हा संघ उपविजेता ठरला. अक्षय स्पोर्टच्या शिवलिंग पाटील याला अष्टपैलू खेळाडू म्हणून रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. 

प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर आधारित नागेश्‍वर कला क्रीडा मंडळ कणकवली यांच्या वतीने भव्य कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते. विजेत्या अक्षय स्पोर्ट्स संघाला रोख 15 हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या कोहिनूर स्पोर्ट्स संघाला 12 हजार व आकर्षक चषक प्रदान करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अभय राणे आणि महेश सावंत यांच्या समवेत नागेश्‍वर कला क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.