Breaking News

तळोदा तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींकडे मागवली विकास कामांची माहिती


नंदुरबार, दि. 18, जानेवारी - तळोदा येथील महसूल प्रशासनाने अवैध गौणखनिजाच्या वापराकडे आपला मोर्चा वळवला आह़े रोज वाहनांची तपासणी करण्यात येत असून दोषी आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आह़े शिवाय तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींना पत्र पाठवून विकास कामांची माहिती तातडीने मागवली आह़े.
तळोदा तालुक्यात अवैध गौणखनिजाच्या वाहतूक प्रकरणी येथील वरिष्ठ महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुका महसूल प्रशासनाने तीव्र मोहिम हाती घेतली आहे. यासाठी ठिकठिकाणी कर्मचा-यांची पथके तयार करुन दोषी आढळणा-या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात आह़े त्यामुळे साहजिकच यातून महसूल विभागाच्या उत्पन्नातही मोठी भर पडत आहे.