Breaking News

2015 च्या हल्ला प्रकरणीतील आरोपींना पाच वर्षांची शिक्षा


जळगाव, दि. 18, जानेवारी - डोक्यात दगड मारल्याने जळगाव जिल्ह्यात आई, वडील व मुलाला पाच वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. 2015 मध्ये झालेल्या एका घटनेतील संशयिताना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका रस्त्याचे कॉँक्रीटीकरण करताना नालीवर फरशी ठेऊ देणार नसल्याच्या कारणावरुन 2015 साली दोन जणांच्या डोक्यात दगड व कु-हाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सुपडू दगा पाटील (वय 56), पत्नी सुनंदाबाई सुपडू पाटील (वय 45) व मुलगा दीपक सुपडू पाटील (वय 24) सर्व रा.उत्राण अ.ह.ता.एरंडोल या तिघांना न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली.