Breaking News

उ. महाराष्ट्र विद्यापीठात बॅटरीवर चालणार्‍या बसचे लोकार्पण


जळगाव, - जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अपारंपारिक ऊर्जेचा वापर जास्त व्हावा या हेतूने कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी अनेक उपक्रम राब विण्याचे ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठातील अंतर्गत वाहतुकीसाठी बॅटरीवर चालणाज्या विद्युत वाहनाचा (बस) लोकार्पण सोहळा आज पार पडला.
गतवर्षीही जुने बसस्थानक ते उमवि अशा शहर बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला होता. तर आज विद्युत वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाने अपारंपारिक ऊर्जेवर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. विद्यापीठाने कायनेटिक ग्रीन एनर्जी कंपनीकडून विद्युत वाहन खरेदी केले आहे. विनाइंधन असलेल्या या वाहनाच्या बॅटरीचे चार्जिंग विजेवर होते. 14 आसन क्षमता असलेली ही बस एकदा चार्जिंग केल्यानंतर 80 किमी. पर्यंत धावते.याप्रसंगी प्रा.बेंद्रे यांनी वाहनाची माहिती दिली. विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनींसाठी अंतर्गत वाहतुक या वाहनाद्वारे केली जाणार आहे.