Breaking News

विकासाचा मोठा पल्ला गाठायचाय : आ. कोल्हे धामोरी-रवंदे पुलाचे भूमीपुजन उत्साहात


कोेपरगांव : शहर प्रतिनिधी :- कोपरगांव मतदार संघाचा गेल्या १० वर्षांच्या विकासाचा बॅकलाॅग भरतांना दमछाक होत आहे. शिवारातील शेतक-याला त्याच्या शेतमालाची ने आण करणे सुकर व्हावे, यासाठी तालुक्यातील असंख्य प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. काळधोंडी नदीवरील पुलाचे काम रखडले होते. त्यासाठी शानसनांकडून २ कोटी ६३ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून आणला आहे. माजीमंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी माणसे जोडण्याची शिकवण दिली आहे. त्या माध्यमातून अव्याहतपणे काम सुरू आहेत. दिनदलित, गोरगरीब आदिवासी मागासवर्गीय आदी प्रत्येक घटकांना गेल्या साडेतीन वर्षांत प्रत्येक गावात विकासाचा निधी पोहचविला आहे. अजूनही विकासाचा मोठा पल्ला गाठायचा आहे, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले. 
वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या धामोरी-रवंदे या प्रमुख जिल्हा मार्ग-४ या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणांचे कामास नुकताच प्रारंभ झाला. यासाठी २ कोटी ६३ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, काळधोंडी नदीवरील पुजाचे भूमिपुजन माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि आ. स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत काल {दि. २९} मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. 

याप्रसंगी संजीवनी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान पानगव्हाणे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संचालक साहेबराव कदम, अशोक भाकरे, कैलास माळी, पोपट पगारे, माजी सभापती सुनिल देवकर, माजी उपसभापती वैशाली साळूंके, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, माजी गटनेते केशव भवर, भिमराज भूसे, उत्तमराव चरमळ, जयराम गडाख, संजीवनी पतसंस्थेचे सखाहरी उगले, मळेगांवथडी सोसायटीचे संतोश दवंगे, वाणी विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कोपरगांवचे अभियंता कोकणे यांनी प्रास्तविक केले. आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नांने गेल्या साडेतीन वर्षांत कोपरगाव मतदार संघातील ९७ किलोमीटर लांबीचे सुमारे ५० कोटी रूपये खर्चाची कामे प्रस्तावित झाली. त्यातील काही कामे मार्गी लागली आहेत. यावेळी धामोरी, रवंदे, मळेगांवथडी पंचक्रोशीतील नागरिकांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना अडीअडचणी सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भाकरे यांनी केले. सोपान कासार यांनी आभार मानले.