Breaking News

‘अमृतवाहिनी’मध्ये ‘वादळातील दिवा’ कार्यक्रम


संगमनेर प्रतिनिधी :- येथील अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कुल, अमृतनगर येथे येत्या बुधवारी {दि. ३१} सायंकाळी साडेसहा वाजता ‘आर्टिस्ट इन रेसिडेन्सी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फुर्तीदायी जीवन कार्यावरील शालेय विद्यार्थ्यांचा ‘वादळातील दिवा’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती संस्थेच्या विश्‍वस्त शरयू देशमुख यांनी दिली. भारतातील प्रथितयश डॉन्स व ड्रामा डायरेक्टर आणि अभिनेता जगजित सेठी यांनी हा कार्यक्रम बसविला आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार आहे. इंटरनॅशनल स्कुलमधील इ. ३ री व ४ थीच्या ५३ विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. या कार्यक्रमास पालक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य श्रीमती जे. बी. शेट्टी यांनी केले.