महिलेचा रेल्वे स्थानकात आत्महत्येचा प्रयत्न; घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद
मुंबई, दि. 28, जानेवारी - टिळक नगर रेल्वे स्थानकात एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आरपीएफ जवानाच्या आणि मोटारमनच्या समय सूचकतेमुळे या महिलेचा जीव वाचला.
टिळक नगर रेल्वे स्थानकात रेल्वेची वाट पाहत असलेल्या महिलेने अचानक रेल्वेसमोर उडी मारली. तिला उडी मारताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या जवानाने मोटरमनला गाडी थांबवण्याचा इशारा करत त्या महिलेला मोठ्याने हाका मारून बाजूला होण्यास सांगितले. सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तिने कबूल केले.