स्थायी समिती सदस्यांचे 7 फेब्रुवारीला ’ड्रॉ’
पुणे, दि. 28, जानेवारी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची फेब्रुवारीअखेर मुदत संपणार आहे. समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 नगरसेवकांना स मितीतून बाहेर पडावे लागणार आहे. 7 फेब्रुवारीला ’ड्रॉ’ काढला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निव ृत्त होतात. ती नावे चिठ्ठी काढून निश्चित केली जातात. फेब्रुवारीच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सात फेब्रुवारीला ’ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली होणा-या सभेत आठ सदस्यांच्या नावाचा चिठ्ठी काढली जाईल व ते समितीतून बाहेर पडतील.
स्थायी समितीमध्ये अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवाणी (भाजप), राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे सदस्य आहेत. त्यापैकी आठजणांची चिठ्ठी निघेल. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारीमध्ये महासभेत निवड केली जाणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा याप्रमाणे पन्नास नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपकडून विद्यमान दहा सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा द्यायला लावून नवीन दहा सदस्यांना संधी दिली जाऊ शकते.