Breaking News

मिनीबस कोसळून पुण्यातील 13 जणांचा मृत्यू


पुणे, दि. 28, जानेवारी - कोल्हापूर येथे पंचगगा नदीवरील शिवाजी पुलावरून एक मिनी बस पुलाचा कठडा तोडून खाली पडून बसमधील 13 जण ठार तर 4 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण बालेवाडी आणि पिरंगुट येथील असून गणपतीपुळे येथून कोल्हापूरला येत असताना रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 
ही मिनी बस (एमएच 12 एनएस 8556) गणपतीपुळ्याहून दर्शन घेऊन परत येत असताना कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. ट ्रॅव्हलरमध्ये एकाच कुटुंबातील 16 जणांचा व एक चालक अशा 17 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुणे बालेवाडी येथील भरत केदारी यांचे कुटुंब असल्याची मा हिती पोलिसांनी दिली आहे. बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने सुरूवातीला बचाव कार्य सुरू होते, 2 तासानंतर व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये 17 जण होते. तीन क्रेनच्या मदतीने बचावकार्य सुरु होते. अंधार असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. जखमींना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरा सुरु होते. अपघातातील मृतांची नावे - संतोष बबनराव वरखडे (45) गौरी संतोष वरखडे (16), ज्ञानेश्‍वरी संतोष वरखडे (14), सचिन भरत केदारी (34), निलम सचिन केदारी (28), संस्कृती सचिन केदारी (8), सानिध्य सचिन केदारी (9), साहिल दिलीप केदारी (14), भावना दिलीप केदारी (35) , श्रावनी दिलीप केदारी (11), छाया दिनेश नांगरे (41), प्रतिक दिनेश नांगरे (14), मृतामध्ये वाहन चालकाचाही समावेश आहे मात्र वाहनचालकाचे नाव समजू शकले नाही.जखमी व्यक्तींची नावे -प्राजक्ता दिनेश नागरे (18) , मनीषा संतोष वरखडे (38) , मंदा भरत केदारी (54)