Breaking News

बनावट नोटांचा कारखाना उद्धवस्त


सोलापूर : तालुक्यातील टाकळी येथे 50 व 100 रुपयांच्या बनावट नोटा छापणार्‍या दोन संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून बनावट नोटासह नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक पोलीस कॉन्स्टेबल (जळगाव) आहे. वशिष्ट कुंडलिक जाधव (वय- 42 रा.टाकळी (टे) ता. माढा) व रवीकांत वसंत पाटील (वय-49 रा.साईभक्ती रेसिडेन्सी, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना माढा येथील न्यायालयात हजर केले असता दोघांना 30 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिश ए. आर. सय्यद यांनी आदेश दिले आहेत.