Breaking News

यशस्वी उद्योजिका भगिनींचा सार्थ अभिमान : राठी


संगमनेर/प्रतिनिधी। महिलांना यशस्वी उद्योगिनी होण्यास संगमनेर मर्चंटस् बँकेचा सदैव हातभार असतो. स्वकर्तृत्वावर प्रगती करणाऱ्या उद्योजिका भगिनींचा बँकेला सार्थ अभिमान आहे, असे मत बँकेचे चेअरमन प्रकाश राठी यांनी येथे व्यक्त केले.
संगमनेर मर्चंटस् बँकेच्या महिला सभासदांचा स्नेहमेळावा नुकताच वातावरणात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ. निशिगंधा दिवेकर, गुरुनाथ बाप्ते, अर्चना माळी, ज्योती पलोड, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सुरम आदी उपस्थित होते.

या स्नेहमेळाव्याला हजारो महिला सभासद उपस्थित होत्या. यावेळी बोलतांना राठी यांनी बँकेची भूमिका सविस्तरपणे विषद केली. अधिकाधिक स्वतंत्र व्यवसाय करावा, यासाठी बँकेच्या असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन महिलांना उद्योगिनी होण्यासाठी बँक सदैव प्रोत्साहन देत असल्याचे सांगून ते म्हणाले, बँकेने दिलेल्या अर्थसहाय्याचे अनेक महिलांनी सोने करून दाखविले. बँकेच्या अर्थसहाय्यामुळे त्यांनी मोठी भरारी घेतली. त्यांच्या कर्तृत्वाला साथ देता आली, याचा बँकेला नक्कीच अभिमान आहे. वर्षा गोरे यांनी उपस्थित महिला सभासद, ग्राहक, कर्जदार व ठेवीदार यांना बँकेतील विविध नवीन योजना, डिजिटल बँकिंग व्यवहाराबद्दल माहिती दिली. यावेळी विशेष निमंत्रित महिला उद्योजिका धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या संचालिका डॉ. दिपाली पानसरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मर्चंटस्ची भक्कम साथ मिळाल्याने संगमनेर सारख्या शहरात अद्ययावत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणे शक्य झाले. याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. बँकेत मिळणारी दर्जेदार व वेगवान अत्याधुनिक ग्राहकसेवा-सुविधांची डॉ. पानसरे यांनी प्रशंसा केली. 

आहारतज्ज्ञ डॉ. निशिगंधा दिवेकर यांनी महिलांचे ‘आरोग्य व आहार’ या विषयावर माहिती दिली. महिलांना आरोग्य व आहार या विषयावर जागरूक राहण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा महिलांवर चांगला प्रभाव दिसून आला. यावेळी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित सभासदांपैकी निर्मला धारिवाल, कमलाबाई झंवर व रंजना भुतडा या भाग्यवान विजेत्यांना तसेच 'आरडी एफडी' मधील लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांक संगीता किशोर क्षत्रीय तर द्वितीय क्रमांक अलका येडे यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पलोड यांनी केले. यावेळी कल्पना राठी, स्वाती बाप्ते, पडतानी, उज्वला पारख, शैला दिवेकर, आशा वाकचौरे, संगीता मेहता, राधिका सोमाणी, पदमा कलंत्री, लाहोटी, किर्ती करवा, राखी करवा, मनीषा जाजू, अश्विनी राठी, भाग्यश्री कर्पे आदींसह बँकेच्या महिला सभासद मोठया संख्येने उपस्थित होत्या. संचालिका ज्योती पलोड यांनी आभार मानले.