Breaking News

टाटा कॅपिटल फायनान्सने आयोजित मेळाव्यात तोडफोड

पुणे, दि. 21, जानेवारी - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी टाटा कॅपिटल फायनान्सने आयोजित केलेल्या मेळाव्यात नागरिकांनी तोडफोड केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्तात घर देण्यात येणार असल्याचे सांगून आम्हाला येथे बोलावले. याठिकाणी आल्यावर मात्र 60 ते 70 लाख रुपयांपर्यंत घरे देणार असल्याचे सां गितले, असा आरोप नागरिकांनी केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी स्टॉलची तोडफोड केली. मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. दरम्यान, गैरसमाजातून नागरिकांनी तोडफोड केली असल्याचे टाटा फायनान्सने सांगितले. 


पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टाटा फायनान्सने चिंचवड येथील अ‍ॅटो कलस्टरमध्ये मेळावा घेतला होता. पंतप्रधान आवास योजनेतील घरांबाबत कर्ज दिले जाणार होते. फायनान्सने त्यांच्याकडे यादीत नोंदी असलेल्या नागरिकांना या मेळाव्यात बोलविले होते. या ठिकाणी आल्यावर नागरिकांचा गैरसमज झाला. घरांच्या किमती जास्त आहेत. आम्हाला स्वस्तात घर देण्याचे सांगितले होते, असा आरोप करत नागरिकांनी स्टॉलची तोडफोड केली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तोडफोडीनंतर स्टॉल बंद क रण्यात आले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मसाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व नागरिक ांना शांत केले.