Breaking News

पारनेरमध्ये बालकांना दिली पोलिओ लस


पारनेर प्रतिनिधी :- शहरात काल {दि. २८ } सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील दोंदे स्मारक येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ अंतर्गत शून्य ते ५ वर्षे वयोगटातील अनेक बालकांना पोलिओची लस देण्यात आली . या मोहिमेचा प्रारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली धाडगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक गाडेकर, डॉ. ए. सी. शिंदे, आरोग्यसेवक जे झावरे, आशा सुपरवायझर सुनंदा भिसे, सुपरवायझर आर. एस. देशमाने, बाबासाहेब लकडे, जनाबाई हारदे, आशा औटी, कक्षसेवक जी. पी. बोढरे, जी. आर. ओंबळे, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेजचे प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते. शहर व वाड्या वस्त्यांवरही पोलिओ लसिकरण करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय, वैद्य वस्ती अंगणवाडी, बसस्थानक, बुगेवाडी, हवालदार वस्ती याठिकाणीही आरोग्ययंत्रणेकडून योग्य नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेत ग्रामीण भागात काम करणा-या आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.