Breaking News

पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 10 जण जखमी


उस्मानाबाद, दि. 21, जानेवारी - तेर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 10 जण जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या ग्रामस्थांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असून अन्य 6 जणांना कुत्र्याने चेहर्‍यावर चावा घेतला. या घटनेमुळे येथील परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणखी ग्रामस्थांना हे पिसाळलेले कुत्र चावू नये म्हणून गावकर्‍यांनी कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार केले.