Breaking News

चिचोंडी पाटील गावाने जिल्ह्याला दिले अनमोल ‘हिरे’ राजकीय, सामाजिक क्षेत्रात झळकले गाव


नगर ता प्रतिनिधी :- अवघ्या ९ हजार लोकसंख्या असलेल्या चिचोंडी पाटील गावाची ओळख जिल्ह्यासह राज्यात गेली आहे. राजकीय आणि अन्य क्षेत्रात या गावच्या तरुणांनी एक वेगळा ठसा उमटविला आहे. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून या गावातील तरुण राज्यात विविध क्षेत्रात कार्याची चुणूक दाखवित आहेत. चिचोंडी पाटीलच्या त्या तरुणांनी नगर तालुक्यासह जिल्ह्याचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात झळकविले आहे.
चौकीदाराचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक

पोलीस निरीक्षक मोसीन शेख यांचे वडील चिचोंडी पाटील येथील विश्रामगृहात चौकीदार म्हणून कार्यरत होते. आपला मुलगा आपल्यापेक्षाही वरिष्ठ अधिकारी व्हावा, यासाठी त्यांच्या परिश्रमाचा मान राखत शेख यांनी अधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासासाठी त्यांनी कडक मेहनत घेतली. वयाच्या २१ व्या वर्षी २००७ मध्ये त्यांनी जेल पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला. पहिल्याच भरतीत त्यांना यश आले. त्यांनतर मोसीन शेख यांनी येरवडा येथे आपले कार्य बजावत असताना पुन्हा २०१० साली पोलीस दलात अर्ज केला. जनतेच्या रक्षणासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस दलात काम करायला सुरवात केली. मात्र अधिकारी होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे स्पर्धा परिकक्षेचा लढा त्यांनी सुरुच ठेवला. या लढ्याचे फलित २०१३ मध्ये मिळाले आणि कारागृह सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ते रुजू झाले. शेख सध्या कल्याण {मुंबई} तुरुंग कारागृहामध्ये कारागृह पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहत आहेत.

पितृ छत्र हरवूनही अथक संघर्ष

नगर तालुका राष्टावादीचे कार्याध्यक्ष अशोक कोकाटे ७ वर्षांचे असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले. या खेळण्याच्या या वयात कुटुंबाची जबाबदारी स्विकारावी लागली. शेतीकाम आणि शिक्षण याची जोड बसत नव्हती. त्यामुळे त्यांनी १० वी पर्यंतचे शिक्षणही अर्धवट सोडले. त्यानंतर शेती व्यवसाय सुरु केला. मोलमजूर लावून शेती करायची. मात्र त्यांना पैसा कुठून द्यायचा? हा विचार करत कोकाटे यांनी स्वत: शेतीमध्ये १३ तास काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. वयाच्या २२ व्या वर्षापासून त्यांना सामाजीक व राजकीय श्रेत्राची आवड होती. त्यामुळे या क्षेत्रातून ठसा उमठवत २०१२ साली त्यांनी नगर तालुका राष्टवादीच्या तालुका उपाध्यक्षपदाचा कारभार पहायला सुरुवात केली. म्हणून काम सुरू केले. यावेळी विविध आंदोलन व सामाजिक कामात अग्रेसर राहून आतापर्यंत त्यांनी तब्बल २२ आंदोलने करुन चिचोंडी पाटील गावच्या विकासासाठी मोठा लढा दिला आहे.

शिक्षण क्षेत्रासह आंदोलनात मारली बाजी

सुधीर भद्रे हे शेतकरी कुटुंबातील. मात्र त्यांचे चुलते एअरफोर्समध्ये असल्याने उच्च शिक्षणासाठी देशात विविध ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतले. मात्र उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या वाट शोधण्यासाठी धडपड केली नाही. तर सामाजिक कार्य हेच करियरचे क्षेत्र निवडले. वयाच्या २१ व्या वर्षी अभिनव भारतीय युवक संघटनेचे पद घेऊन महाराष्ट्रात त्यांनी लक्षवेधी आंदोलने केली. यामध्ये जिल्हा बँक नोकर भरती प्रकरणात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब हंडे यांच्या तोंंडाला काळे त्यांनी फासले.

शिक्षणातील टॉपर ते सर्वाधिक मतांचे धनी

शाळेतील सर्वात हुशार मुलगा म्हणून ज्याने इयत्ता पहिली ते सिव्हिल इंजिनिअर या शैक्षणिक काळात पहिला नंबर क्रमांक सोडलाच नाही, त्या ‘हुषार’ मुलाने राजकारणात उडी घेतल्यानंतर उपसभापतीपदी जिल्ह्यात सर्वाधिक मतांचे धनी होण्याचा मान मिळविला. इंजिनिअर ते उपसभापती या प्रवासात प्रवीण कोकाटे यांना वडील आणि आजोबांचा राजकीय वारसा कामी आला. आजोबा गावचे उपसरपंच तर वडील १९९५ साली सरपंच झाले होते. शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी मारता आली. सामाजिक क्षेत्राची ओढ असल्याने या शिक्षणाचा फायदा सामाजिक कार्यासाठी झाला. मात्र यासाठी सत्ता महत्वाची असते. त्यामुळे यासाठी सत्तेचा ध्यास घेऊन त्यांनी राजकारणात उडी घेतली. जिल्हा परिषद सदस्य निवडणूक लढवायची तयारी केली. रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरवात केली. त्यांनी केलेल्या शेतकरी आंदोलन आणि वीज प्रश्नी केलेल्या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले.

संभाजी बिग्रेडचे झुंजार जिल्हाध्यक्ष



राजेश परकाळे यांना कुठलाही राजकीय वारसा नाही. वडिलांचे शिक्षण फक्त सातवी. परिसरात नावाजलेल्या परकाळे यांना राजकीय क्षेत्राची कोणतीही आवड नव्हती. मात्र १९९७ साली मराठा सेवा संघाकडे आकर्षित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रत्येक आंदोलनात त्यांनी आपला सहभाग नोंदवला. १९९९ साली मराठा सेवा संघाचे संभाजी ब्रिग्रेड असे नामकरण झाले आणि परकाळे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला. अनेक टोलनाक्यावर सुट्टे पैसे देण्याऐवजी चॉकलेट दिले जात होते, या फसवणुकीबाबत त्यांनी आंदोलन उभारले. त्याचबरोबर मंत्र्यांच्या दालनात प्रथम ठिय्या आंदोलन केले. त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. ‘कोपर्डी’ प्रकरणी त्यांनी शासनाला निवेदन व रास्तारोको करुन शासनाचे लक्ष वेधून आंदोलन उभारले होते.