केंद्रात भाजपचे सरकार येऊन उणेपूरे साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला असून, येणार्या लोकसभा निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी भाजपला दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. मात्र या साडेतीन वर्षांत विरोधकांनी जेवढे मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नसेल, त्यापेक्षा जास्त अडचणी स्वपक्षातील आमदार आणि खासदारांनी मोदी सरकारला जेरीस आणले आहे. रोज नवनवी बेताल वक्तव्यांनी भाजपची जनमानसातील प्रतिमा धुळीस मिळत आहे. काही दिवंसापूर्वीच केंद्रात राज्यमंत्री असलेले अनंत हेगडे यांनी भाजप संविधान बदलण्यासाठी सत्तेत आले असल्याचे वक्तव्य केले. संविधान बदलण्याच्या वक्तव्यावर संसदेत माफी मागून एक महिना पूर्ण होण्याआधीच केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बुद्धिजीवी आणि साहित्यिक हे केवळ सरकारी लाभ मिळवण्यासाठी आपले काम आणि कलांचे प्रदर्शन करतात, असे वक्तव्य करून कर्नाटकमध्ये खळबळ उडवून दिली आहे. खंर म्हणजे हेगडे केंद्रीय राज्यमंत्री असून, जवाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून जसे संविधानविरोधी वक्तव्यांची अपेक्षा नाही, तशीच बुध्दीजीवी साहित्यांकाच्या लिखाणांबद्दल शंका घेण्याची देखील त्यांची लायकी आहे की नाही? याचा शोध त्यांनीच घेण्याची गरज आहे. बेळगावी येथे ‘स्किल्स ऑन व्हिल्स’ या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. साहित्यिक जे काही लिहितात ते साहित्य बनते. त्यांच्या लेखनाला कोणतीही प्रासंगिकता किंवा अर्थ नसतो. फक्त सरकारी जमीन घेण्यासाठी ते असे करतात. हे तथाकथित बुद्धिजीवी मला मनुष्य होण्यास सांगतात. मी काय जनावर आहे का ? मनुष्य जन्मानंतर आपले पुढील लक्ष्य हे देवतांसारखे होण्याचा असला पाहिजे. या सर्वांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यांनी अशी टिप्पणी करणे बंद केले पाहिजे, असे हेगडे म्हणाले. मात्र हेगडे यांच्या वक्तव्यावर भाजपच्या कोणत्याही नेत्याने खुलासा करून, त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही. किंवा त्यांची पक्षातून उचलबांगडी केली नाही. गुजरात निवडणूकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार्या मणिशंकर अय्यर यांचा भाजपने समाचार घेतला हेाता, तर काँगे्रसने त्यांना आपल्या पक्षातून निलंबित केले. मात्र भाजपकडून हेगडे यांच्यावर कोणत्याही कारवाईचा बडगा उचलला नाही, त्यामुळे हेगडे यांच्या वक्तव्याशी भाजप एकप्रकारे सहमत असल्याचेच या विधानातून स्पष्ट होत आहे. वास्तविक हेगडे हे लोकशाही आणि भारतीय संविधानाला मानत नाही, असे त्यांच्या पहिल्या आणि दुसर्या वक्तव्यांतून स्पष्ट दिसून येत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्यांचा अधिकार आहे. त्यामुळे साहजिकच टीका टिपण्णी ही होतच राहणांर. मात्र आपल्यावर होणार्या टीकेमुळे इतके भांबावून जाण्याचे कारण म्हणजे, ज्यांच्या धमण्यातील रक्तात संरजामशाही अस्तित्वात आहे, त्यांना संसदीय लोकशाही देशांतील टीका साहजिकच खुपणार नाही. त्यामुळेच त्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती. जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, विविधतेत ही एकता टिकवून ठेवणारे संविधान म्हणून भारतीय संविधानाचा नेहमीच गौरव केलास जातो. या देशात सर्वच धर्मांना आपले विचार व उपासना करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधान बहाल करते, त्यामुळे देशात आजमितीस तरी शांतता टिकून आहे, याचा विसर कदाचित हेगडे यांना पडला असावा. तसेच साहित्यिक हे मुक्तपणे आपले लिखाण करत असतात. समाजाला दिशा देण्याचे काम साहित्यिक आणि बुध्दीजीवी मंडळी करत असतात. मात्र याच मुक्तपणाला कुठेतरी वेसन घालण्याचे इच्छा हेगडे यांच्यासारख्या राजकीय मंडळींना असल्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केले असावे.
अग्रलेख - लोकशाही विरोधक हेगडे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:19
Rating: 5