‘पद्मावत’ चित्रपटाला संरक्षण दिल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काळं फासू असा इशारा करणी सेनेने दिल्यानंतर मनसेने माघार घेतली आहे. पद्मावत चित्रपटाबाबत मनसेकडून अद्याप कुठलीही अधिकृत भूमिका व्यक्त करण्यात आली नसून सर्वोच्च न्यायालयाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. मनसेचा याप्रकरणाशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पक्षाचे नेते आणि प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली. त्याआधी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीच याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले होते. मनसेने ’पद्मावत’ला संरक्षणही देऊ. चित्रपटाच्या आशयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही एकाही चित्रपटाला विरोध केला नाही, असे ठणकावून सांगतानाच ’पद्मावत’ला होत असलेल्या विरोधाला मनसेने ठाम विरोध केला होता.
‘पद्मावत’प्रकरणी मनसेचा यु-टर्न !
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:06
Rating: 5