वॉशिंग्टन : अमेरिकेत 3 दिवसांपर्यंत चाललेले शटडाउन (कामबंद) संपुष्टात आले. रिपब्लिकन्स आणि डेमोक्रेट्स यांच्यात झालेल्या करारानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शासकीय खर्चासाठी एका अल्पकालीन वित्तसहाय्य विधेयकावर स्वाक्षरी केली. या विधेयकावर स्वाक्षरी झाल्याने मंगळवारपासून सर्व सरकारी सेवा पुन्हा कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात आले. 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेत याच अल्पकालीन खर्च विधेयकावरून सिनेटमध्ये सहमती निर्माण झाली नव्हती. ज्यानंतर ट्रम्प सरकार अधिकृतरित्या शट-डाउनवर गेले होते. यामुळे संघीय कर्मचारी शनिवारपासून विनावेतन काम करत होते.
अमेरिकेतील ‘शटडाउन’ संपुष्टात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:00
Rating: 5