सातारा, दि. 18, जानेवारी - ताथवडा येथील वनक्षेत्रातील अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणी दोघा व्यक्तीच्या विरोधात वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताथवडा येथील वनक्षेत्रातील जागेत अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती वनविभाग फलटण यांना मिळाली त्यानुसार एन. एन. इनामदार वनपाल, मिसाळ वनरक्षक , जाधव वनरक्षक, यांनी एस.के.घाडगे, वनक्षेत्रपाल फलटण व चव्हाण सहाय्याक वनसंरक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली अचानक धाड घातली असता संजय वसंत मदने व मल्हारी नामदेव मदने रा. डिस्कळ ता.खटाव हे दोन इसम ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अनधिकृतपणे वाळू भरून त्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करीत असताना आढळले.
अवैध वाळू उपसा व वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
Reviewed by Dainik Lokmanthan
on
19:00
Rating: 5