रत्नागिरी, दि. 20, जानेवारी - रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तालुकाध्यक्षांची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी आज के ली. त्यामध्ये मंडणगड तालुक्याची जबाबदारी अनंत महादेव लाखण यांच्याकडे सोपविण्यात आली, तर दापोली चंद्रशेखर धनाजी राणे, खेड सचिन रंगराव घाटगे आणि गुहागर तालुकाध्यक्षपदी आनंद गोविंद भोजने यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे विचार आणि माजी खासदार व पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी दिलेली जबाबदारी खांद्यावर घेऊन हे नूतन तालुकाध्यक्ष काम करतील, असा विश्वास नागरेकर यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांचे अध्यक्ष आपली तालुका कार्यकारिणी घोषित करतील, अशी माहिती नागरेकर यांनी दिली.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या 4 तालुकाध्यक्षांची घोषणा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:00
Rating: 5