शहरातील धोकादायक वृक्षांबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस राबवणार हस्ताक्षर मोहीम
नाशिक, दि. 18, जानेवारी - नाशिक शहरात असलेले धोकादायक वृक्ष त्वरित काढावे याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाकडून विभाग निहाय सही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.
मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणार्या वृक्षाची तोड करून त्याचे पुनर्रोपण करावे असे आदेश न्यायालयाने दिले असले तरी सुद्धा नाशिक महानगरपालिकेकडून यावर कुठल्याही प्रक ारची कार्यवाही होताना दिसत नाही. शहरातील वाढत्या वाहतुकीची वर्दळ बघता रस्त्याचे रुंदीकरण झाले खरे पण त्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या धोकादायक वृक्षाबाबत महानगरपालिकेने कोणतेही ठोस पाऊल उचलेले दिसत नाही. नाशिक महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे हे धोकादायक वृक्ष काढले न गेल्याने वाहनांचे अपघात होत आहे.
शहरातील नाशिक-पुणे महामार्ग, सिटी सेंटर मॉल, पेठरोड, दिंडोरी रोड, मुंबई नाका अशा विविध ठिकाणी अनेक वृक्ष असे आहे ज्या मुळे या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या धोकादायक वृक्षाचे पुनर्रोपण केल्यास रस्त्यांवर होणार्या अपघाताना आळा बसेल. वाहनचालक या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन वाहन चालवत असतात. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले अनेक धोकादायक वृक्षाकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अशा धोकादायक वृक्षांवर बॅनर लावले होते. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आनंदवली व गंगापूर रोड रस्त्यावरील धोकादायक वृक्ष काढले त्यामुळे वाहनधारकांना होणारा अडथला दूर झाला आहे. परंतु शहरातील इतर ठिकाणचे धोकादायक वृक्ष जसेच्या तसे असल्याने ते सुद्धा लवकरात लवकर काढण्यासाठीच नाशिक शहरातील सहा विभागात सही मोहीम राबविण्यात येणार आहे. चांगल्या निसर्गासाठी वृक्ष अतिशय महत्वाचे आहे परंतु ते रस्त्याच्या मध्यभागी नसून मोकळ्या भूखंडात हवे असेही शहराध्यक्ष अंबादास खैरे प्रसिद्धी पत्रकात म्हणाले.