सोलापूर, दि. 20, जानेवारी - ब्रह्मपुरी भीमा नदीपात्रातून वाळू चोरून घेऊन जात असताना पोलिसांनी वाळू व ट्रॅक्टरसह 6 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस कॉन्स्टेबल अनिल दाते यांनी फिर्याद दिली आहे. नदीचे पात्र पाण्याविना कोरडे असल्यामुळे वाळूची चोरी होत असल्याची माहिती, पोलिसांना समजताच पोलिसांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता सोनालिका इंटरनॅशनल कंपनीचा नंबर प्लेट नसलेला ट्रॅक्टर नदीपात्रात वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. पो लिसांनी ट्रॅक्टर जप्त करून मंगळवेढा पोलीस स्थानक आवारात आणून लावला आहे. पोलीस हवालदार निवृत्ती कोळी तपास करीत आहेत. नदी पात्रातील पाणी कमी झाल्यामुळे वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. ब्रह्मपुरी येथे बैलगाड्या वाळू उपसा करीत असताना एका पोलिसांने तोडपाणी करीत बैलगाड्या सोडून दिल्याची चर्चा आहे. एकीकडे वरिष्ठ अधिक ारी वाळू चोरीविरूद्ध मोहीम राबवित असताना पोलीस मात्र तोडपाणी करून गाड्या सोडून देण्याचा प्रकार करीत असल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाळू चोरी : ट्रॅक्टरसह 6 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:45
Rating: 5