Breaking News

राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम


ठाणे, दि. 20, जानेवारी - मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत. या स्मृतिशताब्ब्दी वर्षाचा प्रारंभ पुण्यातुन होणार असून 23 जानेवारी रोजी क ल्याण शहरात दणकेबाज कार्यक्रम होणार आहे.
राम गणेश गडकरी यांचे शिक्षण व लेखन पुण्यातच झाले असल्याने स्मृतिशताब्दीचा प्रारंभ 22 जानेवारी रोजी स्मृतिशताब्दीच्या पूर्वसंध्येला होणार आहे. 22 जानेवारी रोजी सायंक ाळी 4 वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरानजिक स्मृतिशताब्दीचा प्रारंभ होणार आहे. यासमयी पुण्यातील सीकेपी संस्थेचे कार्यकर्ते व गडकरी प्रेमी उपस्थित राहणार आहेत. 23 जानेवारी रोजी सकाळी राम गणेश गडकरी यांच्या जन्मस्थानी नवसारी येथे राम गणेश गडकरी यांना श्रध्दांजली वाहुन स्मृतिशताब्दी वर्षांचा शुभारंभ होणार आहे.