आ.डॉ.तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक मैत्री दिनासह 357 युवकांचे रक्तदान
सत्यजीत तांबे म्हणाले कि, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे मार्गदर्शनाखाली जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून रायभर युवकांची मोठी फळी निर्माण केली असून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. आमदार डॉ.तांबे यांचा वाढदिवस साजरा करतांना आपण हार,गुच्छ,शाल,फेटे यांना बगल देवून पुस्तक मैत्री दिन व रक्तदान शिबीराचे आयोजन करुन अनोखा उपक्रम राबविण्यात आला.प्रत्येकाला वाचनाचे महत्व कळावे यासाठी पुस्तक मैत्रीचा उपक्रम राबविण्याचा निर्णय जयहिंदच्या कार्यकर्त्यांनी घेतला तो कौतुकास्पद आहे.आजच्या आधुनिक व वि-ाान युगात तंत्र-ाानाने मोठी प्रगती केली असल्याने वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. पण जिवनाला दिशा देण्याचे खरे काम पुस्तके करत असतात.वाचनाची सवय ही चांगली असून यामुळे -ाान देवाण घेवाणीचे काम पुस्तकाच्या माध्यमातून होत असते.विद्यार्थी दशेपासूनच वेगवेगळे पुस्तके वाचन्याची सवय अंगीकारली पाहिजे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रिडा संकुलनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असून तो एक सामाजिक उपक्रम बनला आहे.रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम केले जाते.यासाठी सर्वांनीच रक्तदान करणे गरजेचे बनले असून रक्तदान ही एक सामाजिक चळवळ बनली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या रक्तदान शिबीरात 357 युवकांनी रक्तदान केले. अर्पन रक्त पिढीने या रक्तदान शिबीरासाठी महत्वाचे योगदान दिले.
