Breaking News

महाराष्ट्र बिझनेस लीडर, इस्त्रायली उद्योजकांनी गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन


देश विदेशातील उद्योजकांनी महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. महाराष्ट्र राज्य हे बिझनेस लीडर असून इस्त्रायलच्या उद्योगपतींनी महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.हॉटेल ताज येथे आयोजित ‘भारत-इस्त्रायल उद्योग संमेलन-2018’ च्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू उपस्थित होते.