Breaking News

कारखान्याला लागलेल्या आगीत 30 ते 32 लाखांचे नुकसान


अकोला, - जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या सिरसो येथील देवकृपा जिनिंग अँड प्रोसेसिंग कारखान्याला आज सकाळी 11 दरम्यान आग लागली. या आगीत प्रोसेसिंग साठी असलेल्या कापसाच्या 200 गाठी जळून खाक झाल्यात. आगीवर नियंत्रण मिळावीण्यासाठी अग्निशमन दलाचे 5 बंब लागले होते. आग आटोक्यात आली आहे. आग लागण्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. सदर माल हा व्यंकटेश वेस्ट प्रोसेजर जयकीसन माणिकलाल डाग यांचा असून अंदाजे नुकसान 30 ते 32 लाख असल्याचे वर्तविले जात आहे.