Breaking News

नांदेडमध्ये घरफोडी : 22.5 तोळे सोन्यासह मोबाईल लंपास

नांदेड, - नांदेड शहरातील नंदकिशोरनगर भागात चोरट्यांनी एक घर फोडून त्यातून 22.5 तोळे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल असा 4 लाख 68 हजार 804 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
नंदकिशोरनगरमध्ये राहणार्‍या सविता नरवाडे या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. काहीवेळानंतर घरी परत आल्या असताना घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेले होते. कपाटातील लॉकर उघडे होते. चोरट्यांनी 22.5 तोळे सोन्याच्या दागिनांसह एक मोबाईल लंपास केल्याचे सविता यांच्या लक्षात आले. यानंतर सविता यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.