Breaking News

स्व. विखेंचे अपेक्षित कार्य संचालक पूर्ण करतील : पाटील


राहुरी प्रतिनिधी - लोकनेते पद्मभुषण खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य वेचले. डॉ. तनपुरे कारखाना सुरु व्हावा, ही त्यांची इच्छा होती. डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुरु करुन संचालक मंडळाने त्यांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे. पुढील काळात या राहुरीच्या कामधेनूला गतवैभव प्राप्त करुन देऊन खासदारसाहेबांना अपेक्षित असणारे सभासद, कामगारांचे हित जोपासण्याचे कार्य संचालक मंडळ करील, असे प्रतिपादन डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी केले आहे. 
लोकनेते पद्मभुषण खासदार डॉ. विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनानिमीत्त त्यांना डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी न्यु आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन शामराव निमसे, संचालक विजय डौले, शिवाजी सयाजी गाडे, महेश पाटील, अशोक खुरुद, मधुकर पवार, रविंद्र म्हसे, भारत तारडे, उत्तमराव आढाव,बाळकृष्ण कोळसे , दत्तात्रय ढुस, अर्जुनराव बाचकर, नंदकुमार डोळस, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. एन. सरोदे, श्रीविवेकानंद नर्सिंग होमचे प्राचार्य डॉ. कड आदी उपस्थित होते. संचालक विजय डौले यांनी आभार मानले.