Breaking News

योगेश जाधवचा मृत्यू पोलीस मारहाणीतच

नांदेड : भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र ्यान आष्टी येथील योगेश जाधव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळेच झाल्याचा निष्कर्ष सात सदस्यीय समितीने काढला आहे, अशी माहिती नॅशनल एससी, एसटी, ओबीसी स्टुडंट्स अँड युथ फ्रंटचे (एनएसएसओएसवायएफ) राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन दवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


योगेशच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधून काढण्यासाठी संघटनेतर्फे 7 जानेवारी रोजी सात सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर घटनेतील तथ्य जाणून घेण्यासाठी 9 जानेवारी रोजी समितीचे सदस्य आष्टी गावात येऊन स्थानिक गावकरी व पोलिसांशी चर्चा करून अहवाल सादर केला. या अहवालात 3 जानेवारी रोजी आष्टीत शांततेचे वातावरण असताना एका पोलीस कर्चचा-याने चालत्या गाडीतून योगेशच्या डोक्यात काठी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दरम्यान त्याचा मृत्यू झाला. असे असले तरी पोलिस अधिक्षक व अन्य पोलीस अधिका-यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दुसरीकडे योगेशचे वडील प्रल्हाद जाधव यांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले.