Breaking News

ध्वजारोहणामुळे आमची राष्ट्रभक्ती द्विगुणित : शेख


श्रीरामपूर प्रतिनिधी :- मूकबधिर विद्यालय हे आम्हाला आमचा परिवार वाटतो. मायेची ममता, थोरामोठ्यांची आशिर्वाद आम्हास येथे मिळाले. मूकबधिर विद्यालयामुळे प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी प्रथमच मिळाली. त्यामुळे आमचा राष्ट्रभिमान व्दिगुणित झाला, असे भावनिक प्रतिपादन तृतीयपंथी समाजाच्या अध्यक्षा सुरैय्या शेख यांनी केले. 
येथील डॉ. दिलीप पडघन यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिन ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन सुरेश बनकर, सचिव नारायण पटेल, खजिनदार भिमजी पटेल, रोटरीचे अध्यक्ष डॉ. सुरज थोरात, सचिव विनोद पाटणी, नेत्रतज्ञ डॉ. सिंधू पडघन, देविदास चव्हाण, ज्ञानेश्वर मुरकुटे, भाऊसाहेब डोळस, उल्हास धुमाळ, तृतीयपंपथीय समाजाच्या हिना, खुशी, आयेशा, डॉ. भारत गिडवाणी, विशाल कोटक, मुख्याध्यापक कल्याण होन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाèयांनी विशेष परिश्रम घेतले.