Breaking News

ख्रिसमस निमित्त अनामप्रेम संस्थेस भेट

अहमदनगर/प्रतिनिधी। आयएमएस या व्यवस्थापन शिक्षण देणार्‍या संस्थेने सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थापनाचा वसा जोपासत एक वेगळ्या धर्तीवर ख्रिसमस महोत्सव साजरा केला. जॉय ऑफ गिव्हिंग हा संदेश देत आयएमएसचे पदाधिकारी ,शिक्षक,कर्मचारी व विदयार्थी यांनी ख्रिसमसचे औचीत्य साधून नगर मधील अंध अपंग मुकबधीर बांधवासाठी कार्य करणार्‍या स्नेहालय संचलित अनामप्रेम संस्थेला धान्य, खाद्यपदार्थ व विविध उपयोगी वस्तू भेट दिल्या .यावेळी फादर अब्राहम फिलीप, संस्थेचे संचालक डॉ.एम.बी. मेहता, डॉ.विक्रम बार्नबस , डॉ.मीरा कुलकर्णी,डॉ.प्रणोती तेलोरे,संगीता फुंदे,नरेंद्र कदम,अनामप्रेमच्या उपाध्यक्ष सौ.अनिता माने, सचिन गारदे, मीना भिंगारदिवे उपस्थित होते.

ख्रिसमस निमित्त आयएमएसमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती.तसेच प्रभू येशूच्या जन्माचा देखावा सर्वांचे लक्षवेधून घेत होता. फादर अब्राहीम फिलीप यांनी यावेळी मार्गदर्शन केले व या उत्सवाचे महत्व सांगितले. सर्वसामान्यांना आनंद देणारा हा उत्सव सगळ्यांना साजरा करता यावा यासाठी एकमेकांना मदत करून सामाजिक भान जोपासण्याचा आयएमएसचा उपक्रम युवकांना सतत प्रेरणा देईल असा विश्‍वास ही त्यांनी व्यक्त केले.आयएमएसचे संचालक डॉ.एम.बी.मेहता यांनी शुभेच्छा दिल्या व अनामप्रेमसाठी सर्वांनी योगदान दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.