Breaking News

सामाजिक उपक्रमांनी सण-उत्सव, वाढदिवस साजरा करणे इतरांना प्रेरणादायी ः आमदार संग्राम जगताप

अहमदनगर/प्रतिनिधी। सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याकडे सध्याच्या युवकांचा कल असून, हा त्यांच्यात झालेला बदल पाहून मनोमन आनंद होत आहे. अनावश्यक खर्च न करता समाजातील वंचितांना मदत करणे, तसेच इतर सामाजिक उपक्रम राबिवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. अरुणोदय गोशाळेत मोठ्या संख्येने गायी असून, त्यांना चारा देऊन पुण्याचे काम केले जात आहे. आज सण, उत्सव व वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी साजरे होत असून, हे कार्यक्रम निश्‍चितच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.


राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष कार्तिक भगत व संजय बुधवंत यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणोदय गोशाळेस चारा देण्यात आला. यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते. यावेळी बाबा गाडळकर, महेश बुचूडे, विनित म्हस्के, माऊली जाधव, अमित औसरकर, दत्ता गाडळकर, राजू शिंदे, सद्दाम शेख, श्रेयस निमसे, श्रेयस कासवा, मनीष फुलडहाळे आदी उपस्थित होते.