छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीस लवकरात लवकर सुरुवात
सदस्य जयवंतराव जाधव यांनी नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सुचनेवर श्री. पाटील यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक विविध विभागांचे एकूण 12 ना हरकत दाखले प्राप्त करण्यात आलेले आहेत. प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही 15.96 हेक्टर इतकी असून ती राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चैापाटीपासून 3.6 कि.मी. व नरिमन पॅाईंटपासून 2.6 किमी. अंतरावर आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या प्रस्तावास शासनाने 28 फेब्रुवारी 2014 च्या निर्णयान्वये मान्यता दिलेली असल्याचे श्री. पाटील यांनी शेवटी सांगितले.