Breaking News

चास शिवारात तरुणावर धारदार वस्तूने वार


चास मधील जाधव मळा येथे राहाणारा अनिल रासकर हा काही मुलांना शिवीगाळ करत असताना तेथील नितीन रासकर हा तरुण मध्यस्तीकरण्यासाठी तेथे आला असता अनिलने नितीन यांस शिवीगाळ करत कसल्याश्या धारदार शास्राने डोक्यावर वार करत त्यास जखमी केले. त्याचअवस्थेमध्ये त्याच्या पोटामध्ये लाथाबुक्क्याने मारहाण करून त्यास जखमी केले. याबाबत नितीन रासकर याने नगर तालुका पोलीस स्टेशन मध्येफिर्याद दाखल केली असून पुढील तपास अबनावे करत आहेत.