टुरिस्ट व्हिसा असणा-या विदेशी नागरिकांनी केली करोडो रूपयांची जमीन खरेदी
अहमदनगर, दि. 11, डिसेंबर - नगर शहराजवळ असलेल्या अरणगाव येथे मेहेरबाबांचे भक्त म्हणून टुरिस्ट व्हिसा मिळवून आलेल्या काही भक्तांनी करोडो रूपयांची जमीन खरेदी केली आहे.या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी प्रसिध्द सिने अभिनेत्री तराणा सिंग व सामाजिक कार्यकर्ते संतोष मेहेत्रे यांनी केली आहे.
अहमदनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देतांना तराणा सिंग म्हणाल्या,अवतार मेहेरबाबांचे भक्त म्हणून भारतात येतांना टुरिस्ट व्हिसा मिळवून अनेक भाविक देशात येत असतात.मात्र त्यांच्यापैकी काही जणांनी या टुरिस्ट व्हिसा तसेच अवैध पॅन कार्डच्या आधारे मेहेराबाद जवळ अरणगाव येथे मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी केली आहे.तराणा सिंग म्हणाल्या,रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मा हितीनुसार विदेशात राहाणा-या कोणत्याही व जे भारतीय नागरिक नाहीत आणि टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या अशा व्यक्तीला भारतात कोठेही कसल्याही प्रकारची मालमत्ता,घर,जमीन खरेदी करण्याचा अधिकार नाही.अशा लोकांना फक्त पर्यटन,धार्मिक,योगा,मित्र,अध्ययन अशा कामांसाठी तात्पुरता व्हिसा दिलेला असतो.त्यांना भारतात मालमत्ता खरेदी करता येत नाही.ही गोष्ट स्पष्ट आहे.मात्र मेहेरबाबांचे भक्त म्हणून भारतात आलेल्या या मंडळींनी करोडो रूपयांच्या जमिनीची खरेदी केलेली आहे. ही गोष्ट कागदपत्रांवरून स्पष्ट झालेली आहे.
तरणा सिंग यांनी सांगितले की,नगर तालुक्यातील अरणगाव जवळ असलेल्या मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबांची समाधि आहे.तेथे चॅरिटेबल ट्रस्ट देखील कार्यरत आहे.जगभरातील तब्बल 151 हून अधिक देशांमधील भाविक समाधीस्थळास दरवर्षी भेट देतात.विदेश मंत्रालय अशा भाविकांना तात्पुरता पर्यटक व्हिसा देते.तात्पुरत्या कालावधीत भारतात आलेले हे भाविक मेहेरबाबांच्या ट्रस्टींची ओळख देऊन मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले आदि ट्रस्टींच्या नावे तसेच त्यांच्या कुटुंबातील अनेकांच्या नावे बेनामी प्रापर्टी खरेदी करीत आहेत.तसेच अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर आणलेला काळा पैसा देखील याच परिसरात दडवून ठेवण्यात आला असल्याचा आरोप तराणा सिंग यांनी केला आहे.
विदेशातून टुरिस्ट व्हिसा घेऊन आलेले हे विदेशी नागरिक घोटाळे करण्यासाठी खोटे स्थानिक रहिवासी दाखले सादर करतात.खरेदीचा व्यवहार करणा-या कार्यालयातील कर्मचा- यांना पैसे देऊन प्लॉट,फ्लॅट खरेदी केली जात आहे.तसेच वरील दोन ट्रस्टींच्या नावे तसेच त्यांच्या कुटुंबियाच्या नावे 80-100 एकर बेनामी प्रापर्टी दाखविण्यात आली आहे.जवळपास मागील 20 वर्षांपासून अशा प्रकारे टुरिस्ट व्हिसा घेऊन आलेल्या अनेक विदेशी नागरिकांनी अहमदनगर सहीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बेनामी प्रापर्टी खरेदी के लेली आहे.या पाश्वभूमीवर सदर घोटाळे करणारे,तसेच या कामात सामिल असणारे सरकारी अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करून बोगस खरेदी केलेल्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात.अशी मागणी करून तराणा सिंग व संतोष मेहेत्रे म्हणाले,अशा प्रकारची चौकशी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर घोटाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे.पुरेसे पाणी व वीज देखील उपलब्ध नसलेल्या अरणगाव सारख्या छोट्या खेड्यात अशा प्रकारच्या व्यवहारांमुळे जमिनीची किंमत सुमारे 12 ते 15 लाख रूपये गुंठा इतकी झाली आहे.एकूणच या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व संबंधितांवर तातडीने कारवाई केली नाही तर पुढील आठवड्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल.