वेश्याव्यवसाय चालवणा-या टोळीविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई
पुणे, दि. 20, डिसेंबर - येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून दोन परदेशी व एक भारतीय मुलींची सुटका केली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे असून तपासादरम्यान आठ जणांच्या टोळीने संघटीतपणे स्वत:च्या फायद्यासाठी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
प्रताप अंतरयामी साहु (वय-26), लिपुन अंतरयामी साहु (वय-23), अमरेंद्र इश्वरचंद्र साहु (वय-28), अजय लोकबहादुर गिरी (वय-25), बिंकु टंकबहादूर छेत्री (वय- 26), शांती लक्ष्मण गिरी (वय-25), रमेश रुद्रबहाद्दुर गिरी (वय-30) आणि बाबुराम भीमबहाद्दुर गिरी (वय-19) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.