शासकीय अधिकाऱ्यांनी जमीन घेतल्याचे पुरावे दिल्यास चौकशी करु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्या श्रीमती हुस्नबानु खलिफे यांनी समृद्धी महामार्गाच्या जमीन विक्रीबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना श्री.फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, या समृद्धी महामार्गासाठी संपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या वाटाघाटीत शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होत नसून पोलिसी बळाचा वापर करुन कोणाच्याही जमिनी ताब्यात घेतल्या जात नाहीत. ज्या शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध आहे, अशा शेतकऱ्यांशी चर्चा सुरु आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव अथवा बळजबरी केली जात नाही.