Breaking News

औरंगाबाद जिल्ह्यातील नियमबाह्य जमीन विक्री प्रकरणी चौकशी - चंद्रकांत पाटील

औरंगाबाद जिल्ह्यातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांनी जमिनीची नियमबाह्य विक्री केल्या प्रकरणी प्रधान सचिवांमार्फत चौकशी करु, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.सदस्य सतीश चव्हाण यांनी नियमबाह्य जमिनविक्री संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. श्री. पाटील म्हणाले, वर्ग दोन म्हणून धारण केलेल्या जमिनीचे विक्री परवानगी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना असताना तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी एन.आर. शेळके यांनी नियमबाह्य जमीन विक्री केली. 


या नियमबाह्य जमीन विक्रीबाबत चौकशी केली. या चौकशीत एकूण 104 प्रकरणात दिलेल्या जमीन विक्री परवानग्या ह्या नियमबाह्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे सर्व परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. श्री. शेळके यांना निलंबीत करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुन्हा नव्याने प्रधान सचिवांमार्फत करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अमरसिंह पंडीत, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.