Breaking News

घातक रासायनिक पाणी थेट नाल्यात सोडणा-या कंपनी विरोधात कारवाई

पालघर, दि. 17, डिसेंबर - दिवाणण्ड सन्स औद्योगिक वसाहतीत घातक रसायनावर प्रक्रिया न करता ते थेट उघड्या नाल्यात सोडून प्रदूषण करणार्‍या पालघर प्लायवूड या कंपनीविरोधात तारापूर प्रदूषण नियंत्रण क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी कारवाई केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रार केल्यावर प्रदूषण मंडळाकडून ही कारवाई क रण्यात आली.


पालघरमध्ये दिवाण ण्ड सन्स अल्याळी, पालघर औद्योगिक वसाहत, जेनेसीस वसाहत, दांडेकर वसाहत शिरगाव, सिद्धिविनायक आदी औद्योगिक वसाहती असून सुमार 1 हजार क ारखाने आहेत. जिल्हाधिकारी कार्यालया जवळ असणार्‍या काही कारखान्यामधून केमिकलचा उग्र वास येत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तारापूर नियंत्रण मंडळाकडे करण्यात आली होती. तर माहीम ग्रामपंचायतीने ही काही कारखाने पानेरी नाल्यात प्रदूषित रसायने सोडत असल्याची तक्रर केली होती. त्याअनुषंगाने क्षेत्र अधिकारी अमित लाटे यांनी माहीम ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय मेहेर यांच्या सह पानेरी नदीच्या केलेल्या नाल्याच्या पहाणीमध्ये ड्युरीअन कंपनीच्या मागे चोरट्या पद्धतीने टाकाऊ रसायन नाल्यात सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.
अमोनियाचा साठा तपासणीत सापडला.