Breaking News

आगामी काळात नौदल विमानांची संख्या दुप्पट करणार.

हैदराबाद : आगामी दशकात नौदलाच्या विमान विभागातील संख्या दुप्पट करण्यात येणार असून या विभागात ५०० विमाने तैनात करण्यात येणार असल्याची माहिती नौदल विभागाचे प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी शनिवारी दिली. 

यावेळी ते म्हणाले की, नौदलाच्या विमान विभागात आजघडीला एकूण २३८ विमाने आहेत. यामध्ये लढाऊ विमान, हेलिकॉप्टर व सागरी गस्त करणारी विमाने आहेत. मात्र, पुढील दशकात या विमानांची संख्या २३८ वरून ५०० करण्यात येईल. सरकारच्या 'मेक इन इंडिया' या उपक्रमाअंतर्गत आजघडीला ३५ जहाज व पाणबुड्या निर्माण करण्यात येत आहेत