Breaking News

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मनाई आदेश

ठाणे, दि. 17, डिसेंबर - पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून महागाई, वीज भारनियमन ,पाणीटंचाई व जनतेच्या मागण्यासाठी मोर्चे,आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे सभा कार्यक्रमाचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे तसेच या महिन्यात 25 डिसेंबर रोजी नाताळ (ख्रिसमस) सण साजरा होत आहे या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी पोलीस आयुक्त खालील प्रमाणे मनाई आदेश देत आहेत.

शस्त्रे,सोटे, तलवारी, भाले, बंदुका लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे. दगड किवा क्षेपणास्त्र किवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. सार्वजनिक रीतीने घोषणा देणे , गाणी म्हणणे इत्यादी. पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे,जाहीर सभा , मिरवणुका काढणे घोषणा,प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करीत आहे . हा मनाई आदेश 26 डिसेंबर रोजी रात्रीपर्यंत अंमलात राहील. वरील आदेशाचा भंग करणार्‍यांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे कारवाई क रण्यात येईल.